मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
समाजामध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हे उद्दिष्ट घेऊन नेरूळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाने नुकतंच पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते . या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सन्माननीय श्री प्रमोद कर्णाड (साहित्यिक तसेच अर्थतज्ञ) यांच्या, शुभहस्ते झाले.श्री प्रमोद कर्नाड यांनी गोड स्वरात आशीर्वचन स्वरूप प्रार्थना म्हणून पुस्तक प्रदर्शनाबद्दल संस्थेच कौतुक केलं आणि एक या स्तुत्य उपक्रमाची समाजाने दखल घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून प्रकाश राणे (साहित्यिक व अभिनेते ) हे देखील उपस्थित होते त्यांनी वाचनाचे महत्त्व व त्याचा होणारा मनावर परिणाम याविषयी आपले मत व्यक्त केले.
श्रीयुत प्रकाश लखापते, ग्रंथालयाचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक भाषणात ग्रंथालयाविषयी माहिती व संगणकीय युगात देखील पुस्तकाचं महत्व विशद केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान अरविंद वाळवेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी भूषविले, तसेच ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष श्री दिलीप जाधव, उपाध्यक्ष रमेश गायकवाड रणजीत दीक्षित आणि अनेक मान्यवर श्रीयुत गुमास्ते,दीपक दिघे श्रीयुत अजय माढेकर, गुप्ता झासीकर, अंकुश जांभळे, विजय सावंत श्रीयुत किरण देशपांडे, श्रीमती कमल आंगणे, श्री राव, गौतम कांबळे , उपस्थित होते .
या पुस्तक प्रदर्शनामध्ये कोमल प्रकाशनचे व्ही एस शेटे साहेब तसेच व्यास प्रकाशनचे कैलास आणि अंधश्रद्धा निर्मूलनचे साळुंखे यांनी आपले स्टॉल प्रदर्शनामध्ये मांडले होते. लअनेक पुस्तक प्रेमींनी व मान्यवरांनी प्रदर्शनास भेटी दिल्या त्यामध्ये डॉक्टर अशोक पाटील, तानाजी भगत, नेरूळ पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर, गजानन म्हात्रे, सावली फाउंडेशनचे हांडेदेशमुख, शअश्विनी देशपांडे,घनश्याम परकाळे, महादेव देवळे, प्रवीण पाटील, मनोहर परब प्रामुख्याने उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल सर्व रसिक वाचकांनी समाधान व आनंद व्यक्त केला. दिनांक ६ जानेवारी 2023 रोजी सायंकाळी या पुस्तक प्रदर्शनाचा समारोप प्रशांत पाटील, उपसंचालक , ग्रंथसंचनालय, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच त्यांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनामध्ये सहभागी पुस्तक विक्रेते, वितरक यांचा सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने श्री विकास साठे ग्रंथालय, कार्याध्यक्ष यांनी केले व अत्यंत गोड आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव श्रीमती सीमा आगवणे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करून पुस्तक प्रदर्शन सोहळ्याच्या यशस्वीते बद्दल आनंद व्यक्त केला.