सोलापुर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची सोलापूर जिल्हा स्तरीय सभा बुधवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह सात रस्ता येथे आयोजित करण्यात आली आहे.
शहर व जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संस्था चालकांची सभा होणार असून प्रॉपर्टी टॅक्स, विज बिल,स्वंय मान्यता अनुदान वाटप,आर.टी.ई.प्रतिपुर्ती, दैनंदिन अडचणी, शहर व ग्रामीण स्तरावरील नूतन कार्यकारिणी निवड आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.मा. आमदार विजय गव्हाणे, शरदचंद्र धारुरकर, जागृती धर्माधिकारी, गणपतराव बालवडकर, किशोर माने आदी प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी शहर जिल्ह्यातील संस्थापक अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर निमंत्रक रविशंकर कुंभार यांनी केले आहे.