भाळवणी प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी येथील विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्याजारोहन करताना स्थानिक स्कूल कमेटीचे चेअरमन, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्राम पंचायत कार्यालया समोर सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील, विद्यालयाचे प्राचार्य एन. एम. गायकवाड, उपसरपंच सविता लोखंडे, स्कूल कमिटी सदस्य इ. बा. मुलाणी, भीमराव जाधव, दीपक गवळी, ग्रा. पंचायत सदस्य नितीन शिंदे, सचिन कुचेकर, उपप्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.