श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे टीमला निमंत्रण करकंब नगरी साठी भाग्याचा क्षण
जागर स्वच्छ्ता टीमच्या ३०-३५ महिला व पुरूष स्वच्छतादुतांचा सहभाग
मार्ग स्वच्छ चकाचक करत असतानाचा प्रणवमालक परिचारक व आळंदी देवस्थान चे श्रीधर सरनाईक यांच्या टीमला शुभेच्छा
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आज वसंत पंचमी रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होत असतानाच सायंकाळी ५:००वा विठ्ठल रुक्मिणी मातेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
त्या अगोदर करकंब मधील जागर स्वच्छता अभियान टीम व युगंधर आखाडा टीमच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर नगरीतील संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग नामदेव पायरी,विणे गल्ली,कालीकादेवी चौक,काळा मारुती,चौफाळा,नाथ चौक,तांबडा मारूती,सहकार गणपती असा मार्ग जागर स्वच्छता अभियान टीम मदतीने चकाचक करण्यात आला.
यावेळी स्वच्छता करत असताना अनेकांनी शुभेच्छा दिल्या पांडुरंगाचा आशिर्वाद नक्कीच तुम्हांला लाभणार, सांगितले.यावेळी युगंधर आखाडा टीमच्या वतीने ऐतिहासिक शस्त्र कला पथकाचेही संचलन चौकाचौकात होत होते ते पाहून सर्वांनी कौतुक केले, स्वच्छता पूर्ण झाल्यावर मंदिर समितीने सर्व स्वच्छता दुतांना पददर्शनाचा लाभ दिला व भोजनाचा आस्वाद , प्रसाद देऊन निरोप दिला.
खरोखरच आज सर्व जागर टीमचे सदस्य आनंदी मनाने स्वच्छता करुन कृतकृत्य झाल्याची भावना सर्वांच्या मनात होती,ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी जागर स्वच्छता अभियान टीम,लेकीच झाड टीम आणि युगंधर आखाडा टीमच्या सर्वं स्वच्छता दुतांनी अधिक परिश्रम घेतले.