पंढरपूर प्रतिनिधी
लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या वतीने माजी आमदार,मंत्री लक्षणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल ताई साळुंखे यांचा सत्कार करून शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल विशेष पुरस्कार महिला शिक्षणाच्या आग्रही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी खासदार हुसैन दलवाई यांच्या हस्ते नवी दिल्ली , महाराष्ट्र सदन येथे करण्यात आला.
यावेळी कोमल ताई साळुंखे यांच्या सामाजिक कार्याचा तसेच त्यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल नवी दिल्ली येथे मंगळवार दि.३ जानेवारी २०२३ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुद्वारा रकब गंज साहिब या संस्थेचे अध्यक्ष कुलविंदर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथील एक संस्था महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सारख्या ग्रामीण भागातील एका महिलेचा सन्मान करते,ही बाब सोलापूर जिल्ह्यातील जनतेची मान उंचावणारी आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंगळवेढा सह सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण प्रेमीना आनंद झाला आहे. तसेच कोमल ताई साळुंखे यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
याबद्दल संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातून सौ कोमल ताई साळुंखे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.साहित्य, कला,क्रीडा, शिक्षण या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात येतो.