पालघर प्रतिनिधी उदय वाघवणकर
न्यू कोकण नगर (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण सोसायटी (नियोजित) च्या वतीने विभागातील इयत्ता पहिली ते पदवीधर अशा १४६ विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांचा हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलिमा जाधव ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी महिलांना हळदीकुंकू समारंभाबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
याप्रसंगी या सहकारी सोसायटीचे मुख्य प्रवर्तक विजय वाजे, अध्यक्ष नरेश भावे, सेक्रेटरी सुभाष गवस, खजिनदार रामचंद्र सावंत, कार्यालय प्रमुख नारायण लाड, सल्लागार शांताराम राऊत तसेच इतर सल्लागार, महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.