सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. 01 / 2023 कलम 379,34,411 भादंवि मधील या गुन्हयात आरोपीची नावे 1) अजय सोमा जाधव वय 29 वर्षे रा. घर नं 47 कांती नगर झोपडपटटी दमाणीनगर सोलापूर 2 ) लखन अशोक गायकवाड वय 28 राह. सेटलमेंट फि कॉलनी नं 04 सोलापूर 3 ) निलेश शंकर जाधव वय 33 वर्षे राह. सलगर वस्ती पोलीस ठाणेसमोर सोलापूर सदया राह. हाउसिंग बोर्ड शास्त्रीनगर अंबरनाथ जि. ठाणेभ्भ्) कुशलसिंह जोधसिंह राव वय 38 वर्षे व्यवसाय सोनार राह. रावमादडा झाडोली उदयपूर राजस्थन सदया राह. कृष्णकुंज अपार्टमेंट रूम नं 01 कोहोचगांव अंबरनाथ पश्चिम 5) सुभम सुर्यवंशी राह. राह. हाउसिंग बोर्ड शास्त्रीनगर अंबरनाथ जि. ठाणे (5) राहुल शिंदे राह. राह. हाउसिंग बोर्ड शास्त्रीनगर अंबरनाथ जि. ठाणे-B) अमर शंकर जाधव वय 35 राह. सलगर वस्ती पोलीस ठाणेसमोर सोलापूर सदया राह. पिगंळेवस्ती मुंडवा पासपोर्ट ऑफीस जवळ पुणे यांनी मिळून संगनमताने फिर्यादी नामे संतोष सौदागर नारायणकर वय 42 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. 61 न्यु संजय नगर कुमठा नाका सोलापूर सध्या रा. 104 विंग तोडमल आंगन येवले वाडी कोढवा पुणे यांची आई प्रवास करीत सोलापूर ते गुलबर्गा असे प्रवास करणेकरीता विशाखापटटणम एक्सप्रेस गाडीचे जनरल बोगीत चढत असताना वरील नमुद चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवून सोन्याचे बांगडी कट करून चोरून नेले होते.
तरी पोलीस अधिक्षक पुणे लोहमार्ग यांनी सदर गुन्हयावर र्निबंद घालण्यासाठी आदेशीत केल्यावरून सोन्याचे बागंडी कटींग करून चोरी करणारे टाळीस 15 दिवसात शोध घेवून त्यांचेकडून सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील गु र नं 105 / 2022, 126 / 2022 कलम 379,34,411 भादंवि व कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे कडील गु र नं 98 / 2022 कलम 379,34,411 भादंवि मधील एकुण 10 तोळे वजनाची 273000 /रू कि. चे सोन्याचे लगड व गुन्हयात वापरलेले मोटारसायकल असे एकुण 3,23,000 /- रू कि. चे मुददेमाल जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपीनां अटक करून एकूण 04 गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे श्रिकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिकारी गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग चंद्रकांत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहा. पोलीस उप निरीक्षक संजय जाधव, पो ना 87 प्रमोद सुरवसे, पो कॉ पो कॉ 565 यशवंत जमादार, पो कॉ 195 प्रसाद गायकवाड यांनी केली आहे.अशी माहिती संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.