माढा प्रतिनिधी
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांचा ४ जानेवारी हा जन्मदिवस मराठा सेवा संघ माढा तालुक्याचा वतीने शिक्षण प्रसारक मंडळ,अरण संचलित संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन ग्रंथभेट दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील,माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष अरूण जगताप, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वागज, मराठा सेवा संघाचे मोडनिंब शहराध्यक्ष शेखर सुर्वे, यशवंतदादा शिंदे, शशिकांत गिड्डे, प्रशांत चांगदेव गिड्डे, संतोष भोरे, सतिश घाडगे, वसंत केदार, सिद्धेश्वर मुळिक,किरण शिंदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद भारत आबा शिंदे म्हणाले की, मराठा सेवा संघाचा ग्रंथभेट हा उपक्रम समाजोपयोगी असून वाचनाने व्यक्ती सर्व बाजूंनी विचार करायला शिकतो व प्रगल्भ होतो.पुस्तक हाच सर्वात जवळचा आणि खरा मित्र आहे. जो चांगला सल्ला देतो आणि चांगली शिकवण देखील देतो.
संभाजी ब्रिगेडच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी बाळासाहेब वागज यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष अरूण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.