शेळवे प्रतिनिधी
शेळवे येथील यशोदा प्रतिष्ठान संचलित सणराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे विध्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे म्हणून आनंदी बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.धनंजय काळे,श्री. साहेबराव नागणे व विठ्ठल कालिदास पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून बाजार तळाचे उदघाटन करण्यात आले प्रसंगी पिराच्या कुरोली चे सौदागर सावंत,वाडी कुरोलीचे मारुती काळे,आबासाहेब काळे शेळवे गावचे सरपंच अनिल गाजरे उपस्थित होते, तसेच सनराईज पब्लिक स्कूल शेळवे चे सर्व पालक,शिक्षणप्रेमी नागरीक ग्रामस्थ व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,बहुसंख्येने परिसरातील नागरिक बाजार खरेदीसाठी आलेले होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सनराईज पब्लिक स्कूल नेहमीच वैविध्यपूर्ण आणि नवनवीन उपक्रम राबवत असते,बाजार दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान जागृती,कष्ठाची जाणीव,नफा- तोटा,मापे-परिमाण,आकडेमोड, स्वकमाई या विविध गोष्टींचे ज्ञान त्या मुलांना अवगत व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात येतात.
सदर बाजार दिवसाच्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यानी पालेभाज्या, फळभाज्या,विविध फळे,फुले,किराणा माल,जनरल स्टोअर,स्टेशनरी,लहान मुलांची खेळणी इत्यादीचे 110 स्टॉल लावण्यात आले होते,त्याचबरोबर रुचकर खाण्याच्या मेजवानीसाठी अल्पोपहार, मेवामिठाई आणि बेकरीचे 22 स्टॉल लावण्यात आले होते आजच्या बाजार दिवसाचे वैशिष्टय म्हणजे कृषि साहित्य,खते,बि-बियाण्यांचे ही स्टॉल लावण्यात आले होते, तसेच नामांकित लेखकांची दर्जेदार पुस्तके,कादंबऱ्या, काव्य संग्रह आणि बाल साहित्याची पुस्तके ठेवण्यात आली होती आज झालेल्या सणराईज पब्लिक स्कूल शेळवे आयोजित आनंदी बाजार दिवसामध्ये प्रशालेच्या बालचमुंनी तब्बल एक लाख तेरा हजार सातशे पंचवीस रुपयांची विक्रमी उलाढाल केली.
सदर आनंदी बाजार दिवस यशस्वी करण्यासाठी सर्व विध्यार्थी-पालक, जेष्ठ-श्रेष्ठ ग्रामस्थ,मित्रमंडळी तसेच आजी माजी विद्यार्थी व सर्व सणराईज परिवाराने प्रचंड मेहनत घेतली.
प्रशालेच्या अशा नवनविन व वैविध्यपूर्ण उपक्रमांचे सर्व ग्रामस्थ, पालकवर्ग व मान्यवरांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
बाजार दिवसाच्या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांचे, विध्यार्थी-पालक, ग्रामस्थ,मित्रमंडळी व बाजारकरूंचे सणराईज परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.