सोलापूर प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि.१७ ते १९ डिसेंबर पर्यंत बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.१७ रोजी सांगलीचे युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार वसंत हंकारे हे 'चला जगूया आनंदाने' या विषयावर पहिले पुष्प गुंपणार आहेत. रविवार दि. १८ रोजी सोलापूरचे शिवचरित्रकार व आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न शेटे हे 'चला निरोगी राहू या' या विषयावर दुसरे पुष्प गुंपणार आहेत तर सोमवार दि.१९ रोजी ग्रामीण लेखक अहमदपूरचे मोहिब कादरी हे 'यशस्वी जीवनाचे सूत्र' या विषयावर शेवटचे तिसरे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची व्याख्यान ऐकण्यासाठी श्रोत्यांनी आकाशवाणी रोडवरील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे सायंकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून बौद्धिक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.