भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी सभा मंडपात रविवारी १८/१२/२०२२ रोजी पहाटे ५ - ५५ मिनिट या शुभमुहूर्तावर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या १०९ व्या पुण्यतिथी निमित्त गुलाल व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी भाळवणी व परिसरातील भाविक भक्तांना कळविण्यात येते की या गुलालाच्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भक्त मंडळाचे पदाधिकारी सलीम तांबोळी यांनी केले आहे.