मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
'अस्मिता' सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था ही एक अग्रगण्य,उपक्रमशील संस्था, जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे स्थित असून ही संस्था काळाची पावले ओळखून विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते.संस्थेच्या जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे दिनांक 16 व 17 डिसेंबर 2022 रोजी *वार्षिक क्रीडा महोत्सव* SRP ग्रुप 8 च्या मैदानावर संपन्न झाला.या क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन, ख्यातकीर्त बॉडी बिल्डर भारतश्री, *श्री. सागर कातुर्डे ( मिस्टर युनिव्हर्स)* यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी सालम जीम चे *श्री. सूर्यकांत सालम* , SRP ग्रुप 8 चे पोलीस उपनिरीक्षक व पालक श्री. काशिद साहेब,संंजय स्पोर्ट अकादमीचे *श्री संजय चिंदरकर* , *कु.स्वप्नाली कदम* (कुस्ती, पाॅवर लिफ्टिंग खेळाडू)अनेक पालक, संस्था विश्वस्त *श्री सुनिल जाधव* इ. मान्यवर उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी घोषपथक, विद्यार्थ्यांचे संचलन, मशाल दौड ,क्रीडाशपथ घेण्यात आली.
कबड्डी,क्रिकेट,खो-खो,लंगडी,रस्सीखेच असे सांघिक तर धावणे,रीले, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक इ.वैयक्तिक क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा समारोप *पारितोषिक वितरण समारंभा* ने झाला.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे, ख्यातकिर्त बॅडमिंटनपटू, ज्यांना सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कल्चरल अँड स्पोर्ट क्लब ने लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे, तसेच राष्ट्रीय बॅडमिंटन 60 वर्षांवरील गटात कांस्य पदक प्राप्त, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक *सन्माननीय श्री. मिलिंद पूर्णपात्रे* सर यांच्या शुुभहस्ते, विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ,कुमार आदित्य भोईर व कुमारी वनिता पटेल यांना ढाल देवून गौरविण्यात आले.
श्री. मिलिंद पुर्णपात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केरुन प्रेरित केले. याप्रसंगी,संस्था अध्यक्ष *श्री. चंद्रशेखर पारखी* सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर आशिर्वाद दिले. याप्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी *कु.ओंकार काशिद,* (युरोपियन कराटे चॅम्पियन) विशेष अतिथी म्हणून उपस्थित होता.श्री. सूर्यकांत सालम, ए.सी.पी. श्री मोरे एम.आर., पोलिस निरीक्षक श्री लिगाडे साहेब ,पोलिस उपनिरीक्षक श्री. काशिद साहेब,डाॅ.श्री बी आर राठोड, श्री प्रदीप भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष फडतरे यांनी उपस्थित मान्यवर,शिक्षक आणि पालकांचे आभार प्रदर्शित करुन हा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला