भाळवणी प्रतिनिधी
कोजन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सर्वोत्कृष्ट इन्स्ट्रुमेंट मॅनेजर हा पुरस्कार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे आधीकरी एस वाय सय्यद यांना मिळाल्याबद्दल भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
,यावेळी सय्यद म्हणाले,कोजन– "सर्वोत्कृष्ट Instrumentation Manager /IC" या परितोषिका करीता नॅशनल को-जनरेशन अॅवार्ड्स अंतर्गत निवड समितीने निश्चित केली आहे. ही निवड सहकार क्षेत्रातील प्रकल्पाअंतर्गत बॉयलर 67 kg / cm 2 पेक्षा कमी क्षमता वर्गीकरणात करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमास नामदार श्री. नितीन गडकरी, मा. मंत्री (रस्ते परिवहन आणि महामार्ग) भारत सरकार, हे प्रमुख पाहुणे' असणार आहेत. तसेच श्री. शरदचंद्र पवार, मा. खासदार (राज्यसभा) तथा प्रेसिडेंट कोजन - इंडिया, हे देखिल कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी सरपंच रणजीत बापू जाधव, आरपीआय तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले, दिलीप आप्पा भानवसे, पत्रकार प्रशांत माळवदे,संदीप जाधव,निहालराज शेख, सलीम मुलाणी, भिमराव जाधव सर, सागर चौगुले,रवी शिंदे,दत्ता आंबेकर,वसीम इनामदार,सोमनाथ पाटील, तैजीब मुलाणी व मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.