सोलापूर प्रतिनिधी
अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमा मध्ये सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकारीणी मध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये सोलापूर ( विभाग) अध्यक्षपदी ह भ प बंडोपंत कुलकर्णी यांची निवड करताना ह.भ.प. जोतिराम चांगभले ( प्रदेश अध्यक्ष ) यांनी सूचना मांडली आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ह भ प दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांनी अनुमोदन देऊन एकमताने निवड करण्यात आली.
2010 साली ह भ प बंडोपंत कुलकर्णी यांना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देणेत आली होती . शिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य भजन , कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. भजन, भारूड, कीर्तन , ई. सर्व प्रकारचे कार्यक्रमात गायन करतात. जिल्ह्यातील अनेक सप्ताह संयोजक म्हणून ते सेवा करत आहेत. ह भ प प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या दिंडीतील सेवेत ही निष्ठेने सहभागी असल्या मुळे वारकरी परंपरेची जाण आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक मुलांना व महिला भजनी मंडळाना गायनाचे व भजनाचे शिक्षण 25 ते 30 वर्षा पासून देण्याचे अनमोल कार्य चालू असून तो अनुभव पाहून त्यांच्याकडे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देणेत आली आहे , असे ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी निवडी प्रसंगी म्हटले होते.
या निवडी साठी ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी गौरवोद्गार काढले व अभिनंदन ही केले. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी व भाविकांनी अभिनंदन केले आहे.