वर्धा प्रतिनिधी
वर्धा मुद्रा परिषद व सत्यनारायन बजाज सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि ९, १० व ११ डिसेंबर २२ ला प्राचीन नाणे प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रदर्शनीचे उदघाटन मा श्री पं शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांच्या हस्ते झाले.
यावेळी मंचावर नागपूर निमिस्मॅटिक रिसर्च इन्स्टिटूट चे पदाधिकारी श्री पीयूषजी अग्रवाल , सर्वनीक वाचनालयाचे सचिव श्री गौरीशंकरजी टिबडेवाल, वर्धा मुद्रा परिषदेचे अध्यक्ष श्री राजेंद्र भोयर, श्री अशोकजी शुक्ला, डॉ श्री गिरीश वैद्य होते। या प्रदर्शनास वर्धेकरांनी बघण्यासाठी गर्दी करून चांगलाच प्रतिसाद दिला होता .
यात वर्धा , नागपूर, हैदराबाद, कोलकत्ता येथून संग्राहक व डीलर्स येऊन भाग घेतला होता। स्पार्धाकांमध्ये २० वर्षाखालील अ गट व २० वरील ब गट नुसार स्पर्धकांनी प्राचीन व दुर्मिळ मुद्रा व नोटांचा संग्रह प्रदर्शित केला होता।
११ डिसेंबर २२ ला या प्रदर्शनाचा पारितोषिक सोहळा पार पडला । डॉ श्री सचिनजी पावडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री प्रदीपजी बजाज, श्री नारायणराव देशमुख उपस्थित होते। अ गटात कु श्रुष्टी भोगल प्रथम, कु पावनी कोट्टे द्वितीय व कु विष्णुप्रिय जोशी त्तृतीय पारितोषिकास मानकरी ठरले। तर ब गटात नागपूरचे श्री सुबीर कुमार दासगुप्ता प्रथम, श्री स्नेहजित अ शुक्ला द्वितीय तर श्री राहुल वकारे तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले। चि अमर धमाणे यांना प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आले।
दर्शकांनी या प्रदर्शनाची खूप प्रशंसा केली। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव श्री सचिदानंद जोशी, श्री राजेंद्र भोयर, श्री चेतन अग्निहोत्री, निखिल बाकडे, श्री एच एन घोष, श्री चयन गांधी, श्री योगेश दोषी, श्री स्नेहजित शुक्ला, श्री ज्ञानेश्वर खडसे, श्री हर्षल वानखेडे, श्री निकेश भोगावार, श्री मोहन कुमार शाह, श्री व मसुरकर, श्री रमेशराव बाकडे, श्री नितीन भोगल सहकार्य लाभले।