सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते प्रशालेमध्ये आज शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य ए.एम बनसोडे व पर्यवेक्षक आर.डी शिनगारे यांचे हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक म्हणजे एकूणच सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन प्राचार्य ए.एम बनसोडे यांनी केले.आजपासून गोळा फेक,लांब उडी,100 मी.व 200मी धावणे,कबड्डी,खो-खो,सुर्य नमस्कार, योगासन,स्लो सायकल,दोरीवरील उड्या,थाळी फेक,या मैदानी स्पर्धेबरोबर रांगोळी स्पर्धा तर बौद्धिक स्पर्धेत निबंध, वक्तृत्व,हस्ताक्षर, चित्रकला या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
यावेळी व्ही.एस दराडे,एस.जे कट्टे,डी.एस भाजीभाकरे,जे.सी शेख,एम.व्ही देशमुख, आर.एम जाधव,डी.ए वाघ,एन.एम वायदंडे,एस.व्ही चंदनशिवे,पी.पी गावडे,एस.एस खूपसे,जी.के.पाटील,जी.एस खिलारे,एन.एम लोणकर,बी.एल कोकतरे, सौ.एस.एस इंगळे,पी.व्ही जावीर,आर.डी ढगे,के.डी बोधले,एस.एच मोरे,डी.एम देठे,एस.एन शेजाळ,व्ही.पी घोगले,एस.एस चौधरी,आर.बी घोडके,व्ही.डी पंडीत,आर.बी.हेंबाडे सौ.एस.डी शिंदे,सौ.ए.सी कापसे,एस.सी निंबाळकर,एस.आर देवकर,बी.जे पवार,बी.एस बनसोडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.