मुंबई प्रतिनिधी
कॅन्सर व किडणी ग्रस्त पेशंट महाराष्ट्रातुन तसेच इतर राज्यातून मुंबई येथे येत असतात.अशावेळी हे पेशंट धर्मशाळेचा आधार घेतात.अशावेळी दादर येथील श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळेत खाण्यापिण्याची व रहाण्याची सोय केली जाते.त्याच अनुषंगाने श्री संत गाडगे महाराज यांच्या६६व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दादर येथील धर्मशाळेत पेशंटना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,उद्योजक आणि समाजसेवक श्री.गणेश परब,महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.प्रकाश पाटकर,पूर्वोदय मेलडीज ऑर्केस्ट्राचे संस्थापक-समाजसेवक उदय वाडकर तसेच आयकाॅन महिला उद्योजक क्लबच्या उपाध्यक्षा श्रीमती छाया गचके आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुर्ण दिवसाचे मोफत अन्नदान वाटप करण्यात आले.
याप्रसंगी धर्मशाळेचे प्रमुख व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी स्वागत केले व श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेबद्दल सविस्तर माहिती सांगितली व आभार मानुन अन्नदानाचा कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला.