भाळावणी प्रतिनिधी
वसंतराव काळे विद्यामंदिर चांद्रभागांनगर ,भाळावणी या शाळेत बाल आनंद मेळावा पार पडला .या बाजारात सर्व पालकांनी हजेरी लावली .आपल्या मुलांचे कौतुक करीत सर्वांनी खरेदी केली.
प्रमुख पाहुणे- श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांनी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे व नानासो जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंदी बाजारास सुरुवात केली . विध्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षण देणे गरजेचे आहे तसेच सध्याच्या मुलांना चांगले संस्कार मिळावे यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त काळे गुरुजी यांनी व्यक्त केले.
वसंतराव काळे प्रशालेचे प्राचार्य दादासो खरात यांनीही कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला . प्रस्ताविकामध्ये मुख्याध्यापक संजय काळे यांनी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा - तोटा ,नाणी - नोटा , किलो - डझन या संकल्पना समजतील हे सांगितले . तसेच बाजारात भाजी-पाला फळे पालेभाज्या फळ भाज्या 70 स्टॉल मधून पाणी पुरी, भाजी,भेळ,वडापाव,समोसे,चिवडा,ईडली-सांबर तसेच स्टेशनरी यांची विक्री करण्यात आली.11758 रुपयांची उलाढाल झाली.
या आनंदी मेळाव्यास कार्यकारी संचालक झुंजार आसबे , चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव हणमंत जमदाडे सर,डीस्टीलरी विभाग प्रमुख पोपट घोगरे ,पर्चेस विभाग प्रमुख चंद्रकांत कुंभार,चिप अकाउंटंट बबन सोनवले , प्रशासन विभाग प्रमुख माऊली कुंभार ,चिप अकाउंटंट नवनाथ कौलगे , कॅशिअर लक्ष्मण इंगोले , नानासो जाधव , फराटे साहेब , अंकुश गायकवाड , विजय ढोबळे ,समीर काझी, आदम भाई शेख ,प्रदीप पवार ,विठ्ठल पवार हे उपस्थित राहिले . सूत्रसंचालन पल्लवी काळे यांनी केले. तर आभार नागनाथ जाधव सर यांनी मानले .