सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन Section ११५BAC नुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या आयकर गणनेसाठी माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स. र. मोमीन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन Section ११५BAC नुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत.
तरी आपण वरीलपैकी योग्य असणारा New Tax Regime किंवा Old Tax Regime निवडावा. तसेच याकरिता आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालांचीही मदत घ्यावी. आपण निवडलेले पर्याय कृपया या कार्यालयास वैयक्तिकरित्या / पोस्टाने / ईमेलव्दारे आपले नाव PPO No. 14 Bank व Branch सहीत दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत कळविण्यात यावे, जेणेकरुन आपण निवडलेल्या Tax Regime नुसार देय होणारी TDS बजाती करता येईल.
त्याच प्रमाणे सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निवृत्तीवेतन धारकांनी आयकर नियमानुसार वजावटीसाठी केलेली गुंतवणूक, बचत, विमा पॉलिसी, पॅन कार्ड, इ. माहिती FORM - 12BB मध्ये भरुन गुंतवणुकीच्या सर्व कागदपत्रांसहित दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर येथे जमा करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स. र. मोमीन यांनी केले आहे.
जे निवृत्तीवेतनधारक Tax Regime ची निवड वेळेत कळवणार नाहीत, त्यांची पूर्वीप्रमाणे Old Tax Regime मध्ये TDS वजाती करावी लागेल.
कृपया याची नोंद घ्यावी. Email id : to.solapur@zilla mahakosh.in