सोलापूर प्रतिनिधी विठ्ठलराव वठारे
आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी मोदी येथील जयशंकर तालीम येथे बांधकाम कामगार योजना नुतनीकरण व नवीन कार्ड या शिबीराचे सकाळी 10 ते सायं. 7 वाजेपर्यंत आयोजन केले होते.
मोदी येथील परिसरामधील बहुसंख्य बांधकाम कामगार हे अशिक्षित असून त्यांची रोजीरोटी हि बांधकाम कामावर अवलंबून आहे. त्यांना बांधकाम कामगार योजनेची माहिती नसल्यामुळे ते योजनचा लाभ घेवू शकत नव्हते. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी येथे बांधकाम कामगार शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीरामध्ये बांधकाम कामगार कार्यालयाचे सुनिल हुक्केरी, रविकांत पाटील यांनी या योजनेची संपूर्ण माहिती दिली व कामगारांना मार्गदर्शन केले.
या शिबीरामध्ये 578 बांधकाम कामगारांनी नुतनीकरण व नवीन कार्ड बनविण्याकरीता अर्ज सादर केलेला आहे. सदर शिबीरामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले कि या शिबीराचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व आपले बांधकाम कामगार योजनेचे कार्ड नुतनीकरण व नवीन कार्ड करून घ्यावे जेणेकरून भविष्यात या योजनेचा लाभ मिळू शकेल.
यावेळी संजय हेमगड्डी, बाबू म्हेत्रे, राजू निलगंटी, सुभाष वाघमारे आदी मान्यवर व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.