पिंपळनेर प्रतिनिधी
शिक्षणाची दशसुत्री उपक्रमांतर्गत पुस्तकी शिक्षणा बरोबर कृतीयुक्त व्यवहारिक शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती बारलोणी ता.माढा येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात आठवडे बाजार भरवला. या स्तुत्य उपक्रमाला पालकांचा, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विविध वस्तूंची विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही आनंद घेतला. पालकांनी शाळेच्या क्रियाशीलतेचे कौतुक केले.
तासाभराच्या बाजारात सहा हजार रुपयाची उलाढाल झाली. या आठवडे बाजारातून गणन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सांख्यिकी क्रिया, शाब्दिक उदाहरणे, व्यवहार ज्ञान या बाबींचा प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. प्रारंभी या बाजाराचे उद्घाटन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल,केंद्रप्रमुख सिमिंता कुंभार, सुनील बागल, बाळासाहेब बागल, प्रभाकर बागल, प्रशांत बागल यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या भाषण,संभाषण, संवाद, स्वतःचे म्हणणे स्पष्टपणे मांडणे या भाषिक कौशल्यांचा विकास होण्यास या आठवडे बाजारामुळे मदत होते व मुले निर्भय बनतात असे मत यावेळी केंद्रप्रमुख सिमिंता कुंभार यांनी व्यक्त केले.यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल,केंद्रप्रमुख सिमिंता कुंभार, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील बागल,प्रभाकर बागल,बाळासाहेब बागल,शशिकांत गोरे, प्रशांत बागल,शिवराज बागल, श्रीकांत गोरे, बापूसाहेब घोडके, काकासाहेब लोंढे, आदेश बागल, सर्जेराव भोसले, सोमनाथ बागल, सुनिल लोंढे, नितीन बागल, मुख्याध्यापक निलेश देशमुख, शिक्षिका सुजाता वाघ, अंगणवाडी सेविका सुनिता बागल, उमा बागल, महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या शालेय आठवडे बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, खाद्यपदार्थ, खेळणी व विविध फळांची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती.पवन बागल, शौर्य बागल, आरव गोरे, पुजा बागल, यशराज लोंढे,संकेत ढेरे, अनुष्का बागल, आदिती लोंढे, समर्थ बागल, कल्याणी बागल, सुजाता बागल, विराज घोडके,आर्यन लोंढे, पृथ्वीराज ढेरे या विद्यार्थ्यांनी आकर्षक स्टॉल मांडले होते.