सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चिनके व पाचेगावचे येथे शिवसेना (शिंदे गट)शेकाप व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सरपंच निवड बिनविरोध केली
सविस्तर वृत्त ---चिनके -नाना खंडागळे तिंन्ही पक्षाच्या आघिडीतुन बिनविरोध सरपंच झाले आहेत
मात्र सदस्य पदाच्या निवडणुकीत काही अर्ज राहीले मुळे सर्वच्या सर्व ११ जागेवरती निवडणुक लागली आहे.
पाचेगाव---पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संगीता संजय भोसले या बिनविरोध सरपंच झाल्या आहेत.येथे सुध्दा शिवसेना(शिंदे गट) शेकाप व राष्ट्रवादी अशीच आघाडी होऊन शिवसेना ३ शेकाप ३ व राष्ट्रवादी ३ आसे सदस्य सुध्दा बिनविरोध निवड आले आहेत..पाचेगावचे सरपंच सुध्दा आघाडीचेच आहेत...
बलवडी---बलवडी ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र चित्र अगदी वेगळे आहे इथे ११ पैकी ११ सदस्य बिनविरोध निवड झाली असुन त्यामध्ये शेकापक्ष ७ व राष्ट्रवादी ४ तर शिवसेना (शिंदे गट) यांना एकही जागा नाही मात्र सरपंच पदाची निवडणुक मात्र लागली आहे.
अनकढाळ ---अनकढाळ ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागे पैकी ३ जागा शेतकरी कामगार पक्षाने बिनविरोध जिंकल्या आहेत तर ६ जागेची निवडणुक लागली आसुन येथे सुध्दा सरपंच पदाची ही निवडणुक लागली आहे..येथील संपुर्ण निवडणुक बिनविरोध झाली असती परंतु काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले त्यामुळे ही निवडणुक लागली आहे.
आशा प्रकारे दोन गावांत आघाडीचे सरपंच झाले तर दोन गावात निवडणुक लागली आहे ... राहीलेल्या दोन गावांमध्ये चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी ५ अर्ज तर ११ सदस्य पदासाठी ४३ अर्ज राहीले आहेत.तर शिवणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ जागेसाठी २२ अर्ज राहीले तर सरपंच पदासाठी दोनच अर्ज राहीले आहेत...