पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
विद्यार्थी दिन हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचा हा निर्णय महाराष्ट्र राज्य व शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय स्थानी बोलताना कॅम्पस प्रमुख डॉ. प्राचार्या जयश्री भोसले यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अति उच्च विद्वत्ता, ज्ञान असताना सुद्धा त्यांनी आजन्म स्वतःला विद्यार्थी मानले. यामुळे राज्य शासनाने त्यांच्या शाळेच्या प्रवेश दिनांकास विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचे असे घोषित केले.
या दिवशी शाळा कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा घेतल्या जातात पुढे बोलताना प्राचार्या म्हणाल्या की आजच्या विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी कोणतेही व्यसन नाही केले पाहिजे त्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे. शिक्षक एस आय शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांमधून काजल वगरे, सुफिया शेख,महेश्वरी धनवले यांनी आपले मनोगते व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पी.व्ही.झेंडे,तर प्रस्ताविक विभाग प्रमुख डी.ए.वायदंडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन यु.व्ही.खैरे यांनी केले.संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.