कार्तिकी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित अभंगवाणीने विठ्ठल मंदिर दुमदुमले
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित पहाटे विठूराया चरणी अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला, सुरुवातीला सर्व कलाकारांचा सत्कार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते विठूरायाच वस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला जयजय राम कृष्ण हरी वारकरी बीजमंत्रानी वातावरण विठ्ठलमय झाले.
त्यानंतर देवाचिए द्वारी उभा क्षण भरी, विठ्ठल आवडी प्रेम भाव,तुझी सेवा करीन मनोभावे,विठा लेखिकेला डोळा,पंढरपूरीचा निळा लावण्याचा पूतळा अशी अप्रतिम अभंगरचना गायल्या त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तबला ज्ञानेश्वर खरात टाळ शिवराज पंडीत धनंजय मनमाडकर यांनी केली.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य भंगले गुरुजी बालाजी पुदलवाड साहेब सुधीरभाऊ घोडके, कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा लाखो संख्येने उपस्थित राहतात आणि या सर्वांसमवेत सर्व कलाकारांना गायन सेवा सादर करण्याचं भाग्य लाभले, मनापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे कलाकारांच्या वतीने शतशः आभार मानले.