पुणे प्रतिनिधी
निरा उजवा आणि डाव्या कालव्या संदर्भात कालवे सल्लागार समितीची रब्बी हंगाम २०२२-२३ साठीची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री पुणे यांचे अध्यक्षतेखाली व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे उपस्थितीत आज पुणे येथे पार पडली.
यावेळी मंत्री महोदयांसमोर खालील विषयावर चर्चा झाली.
◼️माळशिरस तालुक्यातील गिरझनी,फोंडशिरस,मांडवे,काळमवाडी,उघडेवाडी या ल.पा.तलावांच्या दुरुस्तीची कामे करण्यात यावी.
◼️निरा नदीवरील को.प.बंधार्यांची दुरुस्ती व नवीन दारे देण्यात यावी.
◼️निरा-देवधर च्या प्रलंबित कालव्याची कामे पुर्ण करण्यात यावी.
◼️पाणीवापर संस्थांचे प्रलंबित प्रश्न,कालव्याची कामे,हस्तांतर,परतावा आदि कामे मार्गी लावण्यात यावीत.
◼️माळशिरस व माचणुर उपविभागाअंतर्गत शाखाधिकारी,कालवा निरीक्षक दप्तर कारकुन यांची रिक्त पदे भरण्यात यावी.
यावेळी माजी मंत्री दत्तात्रय भरणे,आ.राम सातपुते,आ.समाधान आवताडे,आ.राहुल कुल,आ.सुनिल शेळके,मा.आ.दिपक साळुंखे,विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी,व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.