सोलापूर प्रतिनिधी
लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने स्टिपिंग स्टोन प्री स्कूल येथे बाल दिन व जागतिक मधुमेह दिनानिमित्त अभाश्री क्लिनिक व मोरया क्लिनिक यांच्या सहकार्याने तेथील विद्यार्थ्यांना सुवर्ण बिंदू प्राशान व दंत तपासणी आणि त्यांच्या पालकांसाठी मधुमेह तपासणी आयोजित करण्यात आले होते सर्व प्रथम सगळ्या विद्यार्थ्यांचें गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर बोलताना अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत असते, त्याचे फक्त शरीरच नाही तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती व त्याबरोबरच त्याची बुद्धी देखील वाढावी यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्न करीत असतात. आजच्या स्पर्धात्मक युगात आपली मुले टिकून राहणे आवश्यक आहे म्हणून त्यासाठी सुवर्ण बिंदू प्राशन व तसेच लहान मुलांनी दाताची निगा कशी राखावी व त्यांची दुधाचे दात पडून नवीन दात येताना त्यांना होणारा त्रास याच्यासाठी तंत्र रोग तपासणी व त्यांच्या पालक आणि सगळ्यांसाठी सध्या मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे लहानांपासून तरूण आणि वृद्धांपर्यंत ते आपल्या सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होऊ शकतो त्याची दहशत जगभर पसरत आहे.
एकदा मधुमेह झाला की तो मुळापासून नष्ट करणे कठीण असते त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या आजाराने त्रस्त असताना रक्तदाब कमी होणे, मेंदूवर होणारा परिणाम, हृदयाला धोका, जखमा झाल्यानंतर बरी होण्यास वेळ, किडनी पसरणे, दृष्टी कमी होणे अशा अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही हा मोफत कॅम्प आयोजित केला असल्याचे सांगितले.
त्यानंतर डॉ. स्वामी यांनी मधुमेह व सुवर्ण बिंदू प्राशन याच्या वर तर डॉ. अल्पेश खडतरे यांनी दाताची निगा कशी राखावी सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लबचे खजिनदार राजेश परसगोंड ज्येष्ठ लायन नागेश बुगडे स्टिपिंग स्टोन प्री स्कूल चे महादेव ठोंबरे सर मिलिंद ठोंबरे, भारती स्वामी व सविता ठोंबरे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.