पंढरपूर प्रतिनिधी
श्री.रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूरच्या प्राचार्या सौ.गायकवाड नंदिनी विजयराव यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, मुंबई यांचा सन2022=2023 चा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार किशोर दराडे शिक्षक आमदार यांचे शुभहस्ते व, महेंद्र गणपुले अधिवेशन अध्यक्ष, चिंतामणी तारेकर यांचे उपस्थितीत ६१व्या मुख्याध्यापक संघाच्या राज्य स्तरीय अधिवेशनात यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शाल,श्रीफळ,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला.
यानिमित्ताने पंढरीत रुक्मिणी परिवाराच्या नेत्या सौ.सुनेत्राताई पवार.जेष्ठ नागरिक संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या सह श्री.शनी शनेश्वर देवस्थान यांनी श्रीफळ, कृपा वस्त्र , प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना नंदिनी गायकवाड म्हणाल्या की हा सन्मान माझा एकटीचा नसुन संस्था पदाधिकारी, सहकारी, पालक,व शाळेतील बालगोपाळांचा आहे.संस्था सचिव सौ.सुनेत्राताई पवार यांच्यामुळे मला अनेक शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली केवळ यामुळेच हा सन्मान केला असून यामुळे मी प्रोत्साहित होऊन संस्थेचे व प्रशालेचे उज्वल नाव करण्यास मला एक बळ मिळाले असून त्याचा मी निश्चितपणे उपयोग करून शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच मी निश्चितपणाने प्रयत्न करीन. नव्या जगात भरारी मारण्यासाठी मुलांनी हा आपला काळ फुलपाखरासारखा घालवुन बौद्धिकतेच्या जोरावर आत्मविश्वासाने भविष्यात चालायला शिकण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास संस्था सदस्या वसुधा कुंभार, रुक्मिणी बँक संचालिका सविता लोखंडे , सुभद्रा पांढरे यांचे सह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व रुक्मिणी परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले तर आभार माधुरी बोडके यांनी माणले.