पुणे प्रतिनिधी
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी येथील शौच्छालयाच्या दुरावस्थे बाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे गेले 8 महिने पाठपुरवठा करून देखील दखल न घेतल्यामुळे आज पतित पावन संघटना पुणे शहर द्वारे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला .व नैसर्गिक विधीचा हक्क नाकारणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाच्या दारात प्रतीकात्मक संडासला बसून निषेध नोंदवण्यात आला. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भांगे यांना घेराव घातला गेला .
श्री. भांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलवून घेऊन सर्व मागण्या मान्य करत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तत्वतः मोर्चा स्थगित करण्यात आला .
याचे नियोजन पतित पावन कामगार महासंघ अध्यक्ष रवींद्र भांडवलकर व पर्वती विभागप्रमुख संतोष गुरु यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आले व सोबत स्थानिक महिला सुरेखा कांबळे , शाहीन भाभी शेख ,लक्ष्मी काळे , बु बागवान, राजू मंडेल , सुरेश कांबळे , संतोष गुरु ,अज्जू शेख ,भीमा कोळी यांच्या महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि संघटनेचे त्यावेळी संघटनेचे सीताराम खाड़े, पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, धनंजय क्षीरसागर, संतोष शेंडगे, स्वप्नील नाईक, आकाश कोंढाळकर, सौरभ पवार, विजय क्षीरसागर, नरसिंग कोळी, सूरज आप्पा पोटे, राजाभाऊ राजपुत व कार्यकर्ते उपस्थित होते.