अडीच वर्षांपूर्वी हे पोरगं भीमा पंचक्रोशीत माहितीही नव्हतं..त्याची साधी तोंड ओळखही कुणाला नव्हती.. खरंतर विश्वासच बसत नाही.
अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण करून तदनंतर,खासदार मुन्नासाहेब महाडिक यांचे चिरंजीव असणारे या विश्वराज महाडिक या मिशी न फुटलेल्या तरुण पोऱ्याची तुफान एन्ट्री पुळूज ता.पंढरपूर येथे झाली..दोन तीन तालुक्यात त्याच त्याच चेहऱ्यांना पाहून कंटाळलेल्या लोकांना अनपेक्षितपणे आलेल्या या तरुणांकडून आशेचा किरण निर्माण झाला.
आदर्श राजकारणाचे आणि उत्तम समाजकारणाचे बाळकडू जन्मताच घरातून मिळालेले असल्याने अल्पावधीतच त्यांनी भीमा परिसरात सतत संपर्क ठेऊन अगदी झंझावात आणि आदराचे स्थान निर्माण केले..कांहीही कमी नसणाऱ्यां आणि गडगंज मोठ्यांच्या घरात जन्मास येऊनही गोड सुस्वभाव,निगर्वी राजबिंडे सुंदर व्यक्तिमत्व ,भारदस्त शरीरयष्टी आणि उंची,बेस्ट खासमध्ये वक्तृत्व असणाऱ्या या बावीसीतील नवतरुणाकडे आपला हक्काचा माणूस विशु भैय्या म्हणून तरुण ,सर्वसामान्य चटकन आकृष्ट होऊ लागले..झाले
तरुणांची एक मोठी फळी आणि एक झंझावात थोड्याच दिवसात निर्माण करून एक नवीन नेतृत्व गुणाची अगदी जादूची कांडी फिरवल्यागत मोठे कष्ट घेऊन चुणूक त्यांनी कांही महिन्यातच दाखवून दिली..कायम युवकांच्या गराड्यात असणाऱ्या विशु भैय्यांचा लोकांमध्ये सहज वावर आणि निगर्वी अतिशय नम्र स्वभावाने साध्या राहणीमानाने लोकांना त्यांनी अगदीच ऍक्टिव्ह कार्यतत्पर राहून आपलेसे केले..हाथ दिला..आधार दिला..साथ दिली.
खूप दिवसापासून पंढरपूर मोहोळ मंगळवेढा तालुक्यातील लोकांशी पायाला भिंगरी बांधून सतत संपर्क ठेवून त्यांनी केलेली साखरपेरणी भीमा शुगरच्या निवडणुकीसाठी खूप कामी आली..भीमा शुगरचा गड पुन्हा ताब्यात ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आणि योगदान आहे हे नाकारून चालणार नाही..भीमाच्या निवडणुकीत या अगदीच नवख्या असणाऱ्या कालच्या या महाडकाच्या पोरानं,लोकांच्या आशीर्वादानं भल्याभल्यानां घाम फोडून भविष्यकालीन सुध्दा राजकीय हादरे आणि जबर धक्के दिले..खंबीर नवनेतृत्वाची पोकळी भरून काढणेचे नव्याने जबरदस्त संकेत देऊन प्रस्थापितांना घाबरवून सोडले..ओव्हरटेक करून पुढे चाललंय..गेलंय..
भीमा कारखाना चेअरमनपदी विशु भैय्यांची निवड होणार असल्याची पक्की बातमी आहे..त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..मिळालेल्या मिळणार असलेल्या संधीचे आपल्या हातून सोने व्हावे..जबाबदारीचं ओझंही वाढलंय याची जाणीवही असावी..
घरांमध्ये उज्वल वारसा असणाऱ्या या युवा नेत्यांकडून आणि या नवीन चेहऱ्याकडुन तीन तालुक्यातील लोकांच्या खूप होप्स आशा अपेक्षा आहेत.नूतन.चेअरमन निवडीनंतर विशु भैय्यानी अडचणीत असणाऱ्या कारखानदारीला बाहेर काढून भीमा शुगरला नावारूपाला आणावे..पुनरवैभव प्राप्त करून द्यावे.
सभासद शेतकरी आणि कामगारांचे हित जपत त्यांची ऊस बिले ,थकीत देणी ,पगारी वेळेवर द्यावीत.कारखान्यातील अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता करण्याबरोबर आवारातील काटेरी झाडे झुडपे काढून घेऊन रस्ते करून नवीन आणखी सभोवताली वृक्षारोपणही करावे.शिवाय कारखान्याचा कारभार चोख काटकसरीने करून आणि कारखान्यातील अंतर्गत लिकेज काढून नवीन कारखाना आणि को जनरेशन पूर्ण क्षमतेने चालू करनेच्या दृष्टीने चांगले प्रयत्न करावेत..सभासद आणि कामगारांसाठी आणखी चांगल्या सुखसुविधा सोयी निर्माण कराव्यात..त्याद्वारे आपल्या नेतृत्वात भीमराव दादांच्या भीमा शुगररुपी शेतकऱ्यांच्या मंदिराला मागील कांही चुका टाळून चांगले दिवस आणून वैभव प्राप्त करून द्यावे.. आणि सभासद बंधू भगिनींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा.
आपल्या हातून तसे झालेतर जनता तरुणाई तुम्हांस डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही विशु भैय्या.
तेंव्हा भिमाचे चेअरमन पदाची सुसंधी मिळणार असल्याने अगदी ऍडव्हान्समध्येच विशु भैय्या तुमचे आणि तुमच्या नवीन संचालक टीमचे ,खासदार मुन्नाजी महाडिक यांचे माझेतर्फे खूप खूप पुनश्च मनापासून अभिनंदन.
विजयकुमार नागटिळक ,वकील .
सुस्ते ,ता.पंढरपूर ,जी.सोलापूर .
9860443975