सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे,इस्टेट ऑफिसर डॉ. दत्तात्रय नवले, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ.दत्तात्रय गंधमल, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ.प्रदीप तपकिरे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. विजय बिराजदार उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली व त्यानंतर इस्टेट ऑफिसर डॉ.दत्तात्रय नवले यांनी सिंहगड महविद्यालयाविषयी माहिती दिली व त्यानंतर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात यांनी प्रथम वर्षात घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यास व अभ्यासेतर उपक्रमांची माहिती दिली व उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे यांनी महाविद्यालयातील टिचिंग लर्निंग व शैक्षणिक उपक्रम व तसेच उपप्राचार्य डॉ.शेखर जगदे यांनी महाविद्यालयातील प्रशासन व प्लेसमेंट मधील कामगिरी बद्दल अवगत केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सिंहगड महाविद्यालयाची यशस्वी परंपरा ,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध प्रकल्प स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल माहिती दिली. सिंहगड संस्थेचे सहसचिव श्री.संजय नवले यांनी महाविद्यालयातील शिस्तीबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी सिंहगड महविद्यालयातील विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा राऊत व सुझान नदाफ यांनी केले व प्रा. रविंद्र देशमुख यांनी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.