पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव याठिकाणी दिनांक २६ नोव्हेंबर २०२२व २७ नोव्हेंबर २०२२रोजी तालुकास्तरीय क्रीडा आयोजित करण्यात आल्या आज दिनांक २६नोव्हेंबर २०२२रोजी पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली.यास्पर्धेत एकूण ७२शाळानी सहभागी झाल्या होत्या वयोगट १४वर्षे १७वर्षे १९वर्ष या वयोगटात एकूण ८७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तसेच या ठिकाणी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,व क्रीडा शिक्षक,सहभागी होते कार्यक्रमाचे अध्यक्षा. लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले.श्री गजेंद्र पवार सर, चेतन धनवडे सर ,श्री आबा नवले सर, उपस्थित होते.
तर तालुका क्रीडा अधिकारी मोहन यादव यांनी स्कूलच्या प्राचार्या यांचा सत्कार केला. या स्पर्धेमध्ये वय वर्षे १९गटातील दत्त विद्यामंदिर सुस्ते च्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला तर भैरवनाथ वाडी वामनराव माने प्रशाला यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर१७ वयोगटातील मुलांच्या स्पर्धेमध्ये मातोश्री सरुबई माने.विद्यालय भटुंबरे प्रथम क्रमांक मिळवला १९ वयो गटातील मुलांमध्ये विठ्ठल प्रशाला वेणू नगर गुरसाळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धा पाहण्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती.ॲड.प्राचार्य. वामनराव माने उपस्थित होते त्यांचा सत्कार लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. विजय खेळाडूंची संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धा पार पडण्यासाठी क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप, रेखा बंडगर,रुजुता ओव्हाळ,सविता झांबरे, प्रियंका जरे शिक्षक सचिन निकम,अमीर इनामदार, ज्ञानेश्वर वायदंडे,दयानंद जाधव, गजेंद्र व्यवहारे, विनायक देवकते, सुशील कुमार शिंदे,युवराज पाटील, उमेश खैरे,आशुतोष दुधाने,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संपत लवटे आणि शिक्षिका प्रज्ञा कांबळे यांनी केले.