मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल ज्या ठिकाणी राहतात त्या मलबार हील परिसरातील राजभवन पाहण्याचा योग आम्हा मित्रमंडळींना नुकताच आला.२७ नोव्हेंबर रोजी आम्ही जवळचे काही मित्रपरिवार राजभवन बघायला गेलो होतो.
साधारण ४९ एकरात राजभवन वसलेलं असून आता हिवाळ्याच्या मोसमात येथील वातावरण जरा जास्तच थंड असल्याचं जाणवतं.कारण रजभवनाच्या बाजूलाच विस्तीर्ण समुद्र आणि हिरवाई पसरलेली आहे.आमची बरेच दिवसांची इच्छा होती राजभवन पाहण्याची ती आमचे मित्र मनिष भुतकर जे राजभवन मध्ये कामाला आहेत त्यांच्यामुळे पूर्ण झाली.त्यांनी आम्हाला रीतसर परवानगी घेऊन आत नेले.एरव्ही राजभवन अतिदक्षता आणि अतिमहत्वाच्या विभागात मोडत असल्याने सहजासहजी इथे कोणाला जायची परवानगी नसते.आम्ही साधारण दहा बारा जण एकत्र होतो.दुपारी अडीच वाजता राजभवन पाहण्यासाठी सुरू झालेला आमचा फेरफटका (प्रवास) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संपला.
भव्य विस्तीर्ण महाराष्ट्र राजभवन प्रवेशद्वार असे लिहिलेल्या कमानीमधून आत गेल्याबरोबर उजवीकडे मोठी हिरवळ आणि हेलिपॅड आहे. आतील रस्ते विस्तीर्ण आहेत.सन २०१६ मध्ये राजभवनात सापडलेला ब्रिटिश कालीन बंकर हे येथील मुख्य आकर्षण आहे. बंकर मध्ये शिवाजी महाराजांपासून इतर अनेक स्वातंत्र्य सेनानी यांची शिल्प आहेत.अनेक ठिकाणी लाईटचा सुंदर वापर केल्याने बंकर अधिक विलोभनीय दिसतो.कोणालाही बंकरमधील चित्र पाहून फोटो काढण्याचा मोह झाल्याशिवाय राहवत नाही एवढे सुंदर बंकरचे सुशोभीकरण करण्यात आलंय.बंकर मधून बाहेर पडून पुढे थोडे आत गेल्यावर राजभवनात असलेल्या देवीच्या द
मंदिराचे दर्शन होते.येथे देवीची, हनुमानाची आणि शंकराची भव्य मूर्ती आहे. या देवीच्या देवळात पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेल्याच तैलचित्र लावलेले आहे.स्टाफ क्वार्टसच्या पाठीमागे असलेला समुद्र आणि येथून सूर्योदय व सूर्यास्त पाहता यावा यासाठी येथे बसण्यासाठी केलेली आसन व्यवस्था यामुळे समोरील नजारा व्यवस्थित पाहता येतो.
मोरांचा सुंदर विहार पाहण्यासाठी येथे खास मोरघर तयार करण्यात आले आहे.येथे असणाऱ्या रस्त्यांवर मोर सहजच व मुक्तपणे बागडताना (संचार करताना) दृष्टीस पडतात. एकंदरच राजभवनाचा थाट पाहण्यासारखा असून चार पास तास देखील इथे फिरावयास कमी पडतील एवढा विस्तीर्ण हा परिसर आहे. बाहेर निघताना आम्ही सर्वांनीच भुतकर परिवाराचे मनोमन आभार मानले की आम्हला त्यांच्यामुळे राजभवन पाहता आले.
यावेळी योगिता हिरवे, भूषण मुळे, रमेश माळवदे, चंद्रशेखर सावंत, छाया राणे, रोशनी ठोकळे आदी परिवारातील आम्ही मित्रमंडळी आणि आमची बच्चे (गार्गी, प्रथमेश, मृणाल, प्रियांस) कंपनी उपस्थित होतो.