खर्डी प्रतिनिधी
खर्डी तालुका पंढरपूर येथील श्री सिताराम महाराज विद्यालय खर्डी येथे देशभक्त दादासाहेब तथा संभाजीराव शेंडे यांच्या 26 व्या स्मृतिदिनानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या कबड्डी स्पर्धेसाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचे मेडशिंगी, उदनवाडी, गणेश वाडी ,लवंगी, सिद्धेवाडी, कोर्टी, लोटेवाडी या शाखेतील कबड्डीचे 14 वर्ष व17 वर्ष वयोगटातील मुला मुलींचे संघ आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चेअरमन मुकुंद परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड, संस्थेचे संचालक जयंत डोंगरे, संचालक विकास जाधव, संचालक विजय इंगवले, संचालक प्रकाश शिंदे, उपस्थित होते. तसेच खर्डीच्या विद्यमान सरपंच मनीषा सव्वाशे, उपसरपंच शरदभाऊ रोंगे, ग्रामपंचायत सदस्य नारायण रोंगे, सिताराम रोंगे, मोहन रोंगे, या स्पर्धेसाठी पंच म्हणून पांडुरंग कुभांर,सचिन हजारे ,पंचाक्षरी स्वामी,शिवाजी भोसले, यांनी काम पाहिले.
मुख्याध्यापक सचिन कुलकर्णी,पर्यवेक्षक चंद्रकांत रोंगे, आनंदा रोंगे यांच्यासह सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.प्रास्तावीक भारत पाटील सूत्रसंचालन प्रदीप वाघमारे आभार आप्पासाहेब रोंगे यांनी मानले.