मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील आरोग्य सेविका सायली मिर्लेकर या सुट्टीच्या दिवशी पण कर्तव्यावर रुजू होऊन समाजासाठी चांगलं काम करण्यात देखील आनंद मिळत असतो असे सांगतात.
जो अपने बचचोंसे करे प्यार...
वो टीका देनेसे कैसे करें इंकार...
मुंबईमध्ये गोवरच्या साथीची लाट थोपविण्यासाठी जोगेश्वरी पूर्वेकडील स्कवॉटर्स कॉलोनी आरोग्य केंद्राच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका सायली मिर्लेकर यांनी आपल्या विभागात जनजागृती मोहीम सुरू केली असून सर्व लहान मुलांना गोवरची लस टोचून घ्यावी यासाठी पालकांना आवाहन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी लसीकरण मोहीम आखली असून विभागात जाऊन लसीकरण शिबिर आयोजित केले जात आहे.आज वॉर्ड क्र ७८ मध्ये मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.