म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी होणार असून या यात्रेसाठी मंदिर प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.
म्हसवड शहराच्या रिंगावण पेठ परिसरामध्ये पारंपारिक पद्धतीने श्री सिद्धनाथ यात्रा भरते. या दिवशी श्री सिद्धनाथाची म्हसवड येथील रिंगावण पेठेतून यात्रा प्रारंभ होते यावेळी खूप भाविक उपस्थित असतात गेली दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा भरलेली नव्हती.
मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार असल्याचे यात्रा समितीतर्फे सांगण्यात आलेले आहे यात्रेसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असून पोलीस यंत्रणेने म्हसवड- शहरांमध्ये ठिकठिकाणी निरीक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज केली असून सुमारे दीडशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले असून होमगार्ड व स्थानिक स्वयंसेवी संस्था ही सहकार्य करीत आहेत. यात्रा नियोजनासाठी सज्ज करण्यात आलेला आहे म्हसवड पेठ यात्रेमध्ये विविध भागातून दुकाने थाटण्यात आले असून मिठाई खेळणी व विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकाने लावण्यात आलेली आहेत सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविक या यात्रेसाठी उपस्थित असतात.
स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने यात्रा काळामध्ये यात्रेकरूंच्या सुविधा केंद्राची व्यवस्था केलेली आहे यात्रा काळामध्ये गर्दी होऊ नये यासाठी म्हसवड पोलिसांनी यात्रा मार्ग परिसरामध्ये नो पार्किंग झोन केला असून शहराच्या बाहेर वाहन तळ उभा करण्यात आलेले आहेत.
यात्रेकरूंची सोय करण्यासाठी म्हसवड- नगरपालिका सज्ज झाली असून नगरपालिकेने यात्रेकरूंच्या सुविधा विविध ठिकाणी मंडप उभा करून वीज पाणी व आरोग्यव्यवस्था तैनात केलेली आहे.
शहराभोवती असणाऱ्या चार ठिकाणी वाहन तळाशी उभारणी करण्यात आली असून येथे यात्रे करूनी वाहने उभी करावीत असे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले आहे.
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने यात्रा परिसरामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्य,स्वच्छता व आरोग्य याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे वीज मंडळाने यात्रा काळामध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज केली असून शहरातील वीजतारांची दुरुस्ती नुकतीच केलेली आहे पाणीपुरवठा आहे.
म्हसवड नगरपालिकेने ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करून यात्रेकरूंना पाणी उपलब्ध करून दिले आहे म्हसवड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन माने स्वतः प्रयत्न करत आहेत.
रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले असून साध वेशातील पोलीस कर्मचारी यात्रेमध्ये नियुक्त करण्या आलेले आहेत यात्रा परिसरामध्ये पोलीस कक्ष स्वत करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या तक्रारी सूचना या पोलीस मदत केंद्रामध्ये कराव्यात अ आवाहन म्हसवड पोलिसांनी केले आहे. साता जिल्हा वाहतूक नियंत्रण व सातारा परिवहन महामंड यांच्या वतीने जादा बसेस सोडण्यात येणार असू स्वतंत्र बस स्थानक व्यवस्था करण्यात आली.
माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड- रथमार्ग डांबरीकरण करण्यात आले असून सुमारे 65 लाख रुपये खर्चाचा वडजाई ओढा ते रिंगावण पेठ हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला आहे माण नदीच्या पात्रामध्ये पाणी साठल्यामुळे यावर्षी म्हसवड यात्रा बाजार पटांगण व रिंगावन पेठ येथे भरणार असून यात्रेसाठी भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन म्हसवड पोलीस स्टेशन व सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे.