पंढरपूर प्रतिनिधी
ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनला मोठ यश सोलापूर जिल्ह्याची ऊस दराची कोंडी फुटली श्री श्री सदगुरू कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उचल 2500 जमा केली आहे.
ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने साखर वाटून आंनद साजरा केला यावेळी व्हाईस चेअरमन ला साखर भरवून स्वागत केले सदगुरु कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनला सोलापूर जिल्ह्यातील काही चेअरमन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही कुठल्याही चेअरमनच्या दबावाला बळी पडू नका तुमच्या पाठीशी ऊसदर संघर्ष समिती पाठीशी आहे त्यामुळे आम्ही कारखान्यावर जाऊन त्यांची भेट घेऊन साखर चारून स्वागत केले.
यावेळी दिपक भोसले,सचिन पाटील, माऊली हळणवर, समाधान फाटे,माऊली जवळेकर, अजित बोरकर,सचिन आटकळे, निवास नागणे,बाळासाहेब जगदाळे, समाधान काळे,साईल आत्तार,सचिन बोरकर कार्यकर्ते उपस्थित होते.