मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांचे चिरंजीव जागतिक मानवाधिकार ए.एफ चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.
या आधीही ते भारतीय विद्यार्थी सेना महाराष्ट्र चिटणीस,भारतीय कामगार सेनाच्या सह चिटणीस पदी कार्यरत होते. ही नवीन नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.