मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पंढरपूर ते पंजाब अशी सुरू झालेली सायकल यात्रा नुकतीच राजस्थान येथे पोहचली असून या यात्रेचे येथे भव्य प्रमाणात स्वागत करण्यात आले.संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 752 व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) भव्य रथ आणि सायकल परिक्रमेचे निंबेश्वर धाम (सांडेराव, जिल्हा पाली, राजस्थान) च्या पावन भूमीत शेकडो नामदेव भक्तांच्या उपस्थितीत बँड बाजा, टाळ मृदंगाच्या गजरात वाजत गाजत मार्गक्रमण करीत आहे
पंढरपूर भव्य रथ आणि सायकल परीक्रमेचे प्रमुख सूर्यकांत भिसे आणि मनोज मांढरे यांच्यासह सर्वांचे राजस्थानी पगडी, माला आणि श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. त्यावेळी समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय समाजोन्नती संस्थेचे उपाध्यक्ष खेमराज नामा (सोलंकी) यांना राजस्थानी पगडी आणि फुलांचा हार घालून तसेच राजस्थानच्या सिरोही येथील सुप्रसिद्ध तलवार भेट देऊन नामदेव युवा परिषद जिल्हा जालोर/सिरीही/पाली, राजस्थान यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.दिनांक ४ डिसेंबर रोजी सायकल यात्रेचा सांगता समारोह पार पडणार आहे.