भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस सौ व श्री. प्रशांत माळवदे यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली.यावेळी मंदिरात फुलांची, लाईटची सजावट करण्यात आली होती.
यावेळी प्रवीण शिंदे, आनंद देशपांडे,नाना जाधव,दादा आगलावे,जालिंदर शिंदे,प्रा. दत्तात्रय माळवदे, अथर्व माळवदे,आर्यन माळवदे, माणिक इंगोले, पुरुषोत्तम शिंदे, सुधीर गांधी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापूजा केल्या नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी महिला ,भाविक , व ग्रामस्थ उपस्थित होते.