खटाव प्रतिनिधी
खटाव तालुका पाचवड येथे शिवसैनिकानी केले MHT CATपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यां, पालकांचे सत्कार करण्यात आला होता.
याप्रसंगी शिवसेना खटाव तालुका अध्यक्ष शहाजीराजे गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फेटा शाल पुष्पगुच्छ देण्यात आले
खटाव तालुक्यामध्ये शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही शिक्षणातील कोणत्याही विद्यार्थ्यांना अडचणीला शिवसेना बरोबर आहे काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी तालुक्यातील कोणत्याही शिवसैनिकाशी संपर्क साधावा असे आव्हान खटाव तालुका अध्यक्ष शहाजीराजे गोडसे यांनी केले
उप तालुका प्रमुख संतोष भाऊ दुबळे यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आई-वडिलांचे योगदान खूप महत्त्वाचे असते त्याचबरोबर त्यांच्या यशस्वी वाटचालीस गावातील नागरिकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे असते हे पाचवड गावचे विद्यार्थीरुपी रत्न गावाचे नाव महाराष्ट्रातील करतील असे म्हणाले
या कार्यक्रमासाठी उपतालुकाप्रमुख आबासाहेब भोसले, वडूज शहर प्रमुख प्रमुख सुशांत पार्लेकर मायणी चे लखन जाधव पडळ शाखाप्रमुख करण खरात पाचवड मुळीकवाडी कलेढोण गावातील आजी माझी पदाधिकारी सर्व शिवसैनिक व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळेस सांगता व आभार कार्यक्रमाचे सर्व आयोजन खटाव तालुका संघटक माणिक महाराज गाडगे यांनी केले होते.