सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व सोलापूर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र सोरेगाव च्या वतीने महालक्ष्मी मंदिर रामनारायण चंडक विहार सैफुल येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये
1. डॉ. प्रशांत दौंड.
(जनरल फिजीसियन)
2. डॉ. श्रद्धा करकमकर
(कान नाक घसा तज्ञ)
3. डॉ. श्रुती वाघ (यजुर्वेदी)
(स्री रोग तज्ञ)
4. डॉ. दीपाली गाडे
(बाल रोग तज्ञ)
5. डॉ. अश्विनी वांगीकर
(दंत रोग तज्ञ)
6. लायन्स नेत्रालय तज्ञ डॉक्टर
(नेत्र तपासणी)
असे नामवंत तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा मोफत दिली. या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संस्कृती वळसंगकर व त्यांच्या संपूर्ण टीम सह लायन्स क्लब जुळे सोलापूर चे अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे जेष्ठ लायन नागेश बुगडे लायन्स नेत्रालय च्या सुवर्णा काळे, श्री डीकोळे यांच्यासह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.