पंढरपूर प्रतिनिधी
शिस्तप्रिय नूतन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे पंढरपूर येथे आले असता पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच साप्ताहिक ठिणगीच्या दिपावली अंकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, पंढरपूरचे पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, रामचंद्र सरवदे (सा.ठिणगी)पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, दत्ताजीराव पाटील (सा.पंढरी सत्यता) पंढरपूर शहर अध्यक्ष ,सा.ठिणगीचे सह.संपादक नंदकुमार देशपांडे,उप.संपादक जयंत पुराणीक, दैनिक सोलापूर भुषणचे विनोद पोतदार,सा.पंढरी संदेशचे रामकृष्ण बिडकर, पत्रकार सुरक्षा समितीचे खजिनदार बाहुबली जैन आदी मान्यवर उपस्थित होते