चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या जिर्णोधाराच्या कामात येत असलेली पुरातत्व विभागाची अडचण दुर करण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
यावेळी नियोजित नागपूर ते चंद्रपूर मेट्रो प्रकल्पाला लवकर सुरवात करण्यात यावी, वर्धा नदीवर पुलाची उंची वाढविण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, चंद्रपूर येथील वरोरा नाका उड्डाणपूल - सावरकर चैक - बंगाली कॅम्प ते एम.ई.एल ला जाणाऱ्या रेल्वे लाईन पर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात यावे. इत्यादी विषयांना घेऊन भेट घेतली असता यावेळी मंत्री गडकरी यांनी लवकरच सर्व विषयांना न्याय देऊ असे अश्वस्त केले.