सांगोला प्रतिनिधी
प्रभू श्री रामाचा धनुष्य बाण गोठऊन ज्वलंत हिंदूत्ववादी शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने निवडणूक आयोग आणि ४० तोंडाच्या रावणरुपी गद्दारांनी आटोकाट प्रयत्न केले परंतु अशी शिवसेना संपणार नाही ! कारण शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे. म्हणूनच जी क्रांतीची मशाल हे चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाले आहे ते तत्परतेने घराघरात पोहचले पाहिजे.
या उद्देशाने आज युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना उपजिल्हायुवाधिकारी रघुनाथ गायकवाड, युवासेना तालुकायुवाधिकारी सुभाष भोसले व शहर अधिकारी सौरभ चव्हाण तसेत शिवसैनिकांनी अंबिका चौक येथील मंदीरात जगदंबा मातेसमोर मशाल प्रज्वलित करुन सांगोला शहरातील सर्वसामान्य नागरीकांना शिवसेनेच व मशाल या चिन्हाच महत्व पटवून देत ती मशाल छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन वंदन केले.