मोहोळ प्रतिनिधी
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा मोहोळ यांचे वतीने मोहोळ शहरात सर्व प्रमुख मार्गावर संघाच्या स्वयंसेवक द्वारे संचलन परेड कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मोहोळ शहर व तालुक्यातील सर्व स्वयंसेवक या परेडला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर संचलन श्री शेत्र नागनाथ मंदिर पासून सुरू झाले शहरातील सर्व प्रमुख मार्ग द्वारे संचलन करण्यात आले.
या संचलनाच्या सांगता प्रसंगी उपस्थित लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर मोहोळ भाजप तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण संघटक सरचिटणीस महेश सोहनी तालुका सरचिटणीस रमेश माने बाळासाहेब पाटील महादेव माने अरविंद माने गुरुराज तागडे माऊली भगरे युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश झाडे दिलीप कदम अविनाश पांढरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.