केसकरवाडी प्रतिनिधी बिरुदेव केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी मध्ये नवरात्र उसव मोठया आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. मंडळ स्थापना 1996ची असून प्रत्येक वर्षी ज्योत तुळजापूर ते केसकरवाडी अखंडीत आणत असून मंडळाने या वर्षी अनोखा उपक्रम अमलात आणून तो म्हणजे चंडिका यज्ञ केला तो यज्ञ पाच जोड्यांचं हातून पार केला यावेळी दिपक केसकर, प्रकाश केसकर, संजय केसकर, यलाप्पा बंडगर, सहदेव केसकर या पाच यज्ञ करण्याचा मान मिळाला.
यावेळी आंनद देशपांडे काका व त्यांचे सहकारी यांच्या सानिध्यात यांज्ञ संपन्न झाला. यावेळी महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता तर गावातील व परिसरातील भाविक जण हि आपल देवीला साकडं घालण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी तानाजी केसकर ,संजय मासाळ,हणमंत केसकर,लहू केसकर ज्ञानेश्वर केसकर, सहदेव ढोबळे , भीमराव जावीर, प्रशांत बंडगर,अर्जुन जावीर महदेव केसकर, सचिन चोरमले, जीवन माने,ग्रामस्थ उपस्थित होते.