सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी अर्थात जुळे सोलापूर व आभाश्री क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने काल पुष्य नक्षत्राचे औचित्य साधून अभाश्री क्लीनिक द्वारका नगरी विजापूर रोड येथे नवजात बालकापासून ते वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत च्या मुलांना मोफत सुवर्ण बिंदू प्राशान चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत आहे मुलांचे फक्त शरीरच नाही तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती व त्याबरोबरच त्याची बुद्धी देखील वाढावी यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्न करीत असतात आजच्या स्पर्धात्मक युगात आपली मुले टिकून राहणे आवश्यक आहे त्यासाठी आवर्जून प्रयत्नशील राहणाऱ्या आईवडिलांसाठी तसेच भारतमातेची भविष्यातील पिढी सुद्रुढ व बुध्दीमान होण्यासाठी आम्ही लायन्स क्लब जुळे सोलापूर च्या माध्यमातून हा उपक्रम घेत असल्याचे सांगितले.
यावेळी खजिनदार राजेश परसगोंड ज्येष्ठ लायन नागेश बुगडे आभाश्री क्लीनिक चे डॉक्टर एम. एस. स्वामी व डॉक्टर शिवानी स्वामी, श्वेता स्वामी, शिवराज टेंगळे, भाऊसाहेब माने यांच्यासह परिसरातील लहान मुला मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.