मुंबई प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर
शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.सुनिल भार्गवराम शिर्के यांच्या मातोश्री कै.लक्ष्मी भार्गवराम शिर्के(मृत्यू दि.१९/१०/१९९१)यांच्या स्मरणार्थ अॅड.सुनिल शिर्के यांजकडून भायखळा येथील संत गाडगे बाबा अन्नछत्रात अन्नदान करण्यात आले.
श्री.गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट आहे.या धर्मशाळेत कॅन्सर व इतर आजाराने पिडीत ऋग्ण येथे वास्तव्यास असतात. दानधर्म करावा,या उद्देशाने अॅड.सुनिल शिर्के यांनी हे अन्नदान केलेले आहे.
शिर्के हे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे प्रमुख कार्यवाह म्हणूनही कार्यरत आहेत.तसेच त्यांचा विविध सामाजिक संघंटनांशी घनिष्ठ संबंध आहे.अॅड.सुनिल शिर्के यांनी दातृत्वातुन आईच्या स्मरणार्थ केलेल्या अन्नदानाचे कौतुक होत आहे.