सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरहून दिल्लीस जाणाऱ्या नवीन रेल्वेचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीनी केले स्वागत ; हि रेल्वे दैनंदिन सुरू करण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले
सोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी कर्नाटक एक्स्प्रेस केवळ एकच रेल्वे होती. त्यामुळे दिल्लीकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेची अत्यंत आवश्यकता असल्याने हुबळी - नवी दिल्ली ही रेल्वे सेवा सोलापूर मार्गे करावी जेणेकरून कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातील प्रवाश्यांना याचा लाभ होईल यासाठी वारंवार खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी मागणी केली होती. त्या मागणीस यश आले. शनिवारी सकाळी खा. डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी हुबळी - निजामुद्दीन - हुबळी या रेल्वेचे स्वागत करीत ही साप्ताहिक रेल्वे दररोज करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले.
हुबळी - निजामुद्दीन - हुबळी या साप्ताहिक रेल्वेस सुरुवात केली. हि रेल्वे सोलापूरमार्गे दिल्लीस जाणार असल्याने या रेल्वेचे शनिवारी सकाळी ८.३५ वाजता खा. डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी समस्त सोलापूरवासियांच्या वतीने स्वागत केले. तसेच याप्रसंगी रेल्वेत उपस्थित प्रवाशांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच नवनियुक्त डिआरएम नीरज डोहारे यांचे स्वागत केले.
हि रेल्वे सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्यासाठी प्रति शनिवारी सकाळी ८.३५ वाजता सोलापूर येथे तसेच सोलापूरहून हुबळीकडे जाण्यासाठी प्रति सोमवारी रात्री ७ वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्नाटक एक्स्प्रेस शिवाय ही दुसरी रेल्वे गाडी दिलीस जाण्यासाठी सुविधा होणार आहे. सध्या ही गाडी साप्ताहिक असून ही गाडी दररोज सुरू करण्याची मागणी करणार असल्याचेही खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी सांगितले.
या मागणीचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी आभार मानले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, उद्योजक राजशेखर हत्ती, सुरेश हत्ती, चंद्रकांत रमणशेट्टी, चौडप्पा भैरामडगी, प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर,शिवानंद धूत्तरगी आदी मान्यवर तसेच रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.