मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे व मान्यवर नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधीमंडळ पक्ष कार्यालय, मुंबई येथे भारत जोडो यात्रा पूर्वतयारीबाबत बैठक झाली.
भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक
काँग्रेस नेते राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या निमित्तानं आज महाराष्ट्र विधिमंडळातील काँग्रेस सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश प्रभारी श्री. एच. के पाटील जी, बाळासाहेब थोरात जी, अशोक चव्हाण जी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर, माजी मंत्री नितीन राऊत साहेब, माजी मंत्री वर्षाताई गायकवाड ,आमदार अमर भाऊ राजूरकर, यांनी सदस्यांशी यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात चर्चा केली.